चालू घडामोडी ०३ ते ०९ ऑगस्ट २०२०

गिरीश चंद्र मुर्मू: 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG)

भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची नेमणूक करण्यात आली आहे.

ही नियुक्ती राजीव मेहऋषी यांच्या जागी करण्यात आली.

भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे भारतीय संविधानाच्या कलम 148-151 अन्वये स्थापन केलेले पद असून एक प्राधिकारी आहे.

जो शासनाकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळविणारी विभागे व प्राधिकरण यांच्या समावेशासह भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सर्व जमा व खर्चाचे लेखापरिक्षण करतो.

याशिवाय, CAG सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य लेखापरिक्षक आहेत आणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करतात.

जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा

जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करणअयात आली आहे.

जीसी मूर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवारी संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याला एक वर्ष पूर्ण झालं.

मूर्मू यांनी 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती.

राष्ट्रीय हातमाग दिन: 7 ऑगस्ट

7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात “राष्ट्रीय हातमाग दिन” साजरा करीत आहे.

हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित सगळ्या लोकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

सहाव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयाने कोविड-19 महामारी विचारात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला.

“आत्मनिर्भर भारत” साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकून हातमाग निर्यात प्रोत्साहन परिषद आभासी मेळावा आयोजित करत आहे.

इंडियन टेक्सटाईल सोर्सिंग फेअर 7, 10 आणि 11 ऑगस्टला खुले असणार.

नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर

अमेरिकेतील उद्योगपती इलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या ड्रॅगन (आता एंडेव्हर) अवकाशकुपीच्या माध्यमातून अवकाशात गेलेले नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर आले.

नासाने त्यांच्या अवकाशवीरांना अवकाश स्थानकात नेण्याआणण्याचे कंत्राट आता स्पेस एक्स कंपनीला दिले आहे.

बोईंग कंपनीला ही संधी देण्यात आली होती पण त्यांना तसे अवकाशवाहन तयार करण्यात तातडीने यश मिळवता आले नाही.

ही अवकाशकुपी दोन महिन्यांपूर्वी फ्लोरिडातून सोडण्यात आली होती व ती अवकाशस्थानकाजवळ गेल्यानंतर तेथेच होती.

नंतर या अवकाशवीरांचे वास्तव्य पूर्ण झाल्यानंतर त्याच कुपीत बसून ते परत आले.

मिझोरममध्ये जागतिक दर्जाच्या “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे उद्‌घाटन

4 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते मिझोरममधील “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले.

हा प्रकल्प भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेच्या अंतर्गत तयार केला जात आहे.

स्वदेश दर्शन-ईशान्य सर्कीट अंतर्गत, नवीन पर्यावरणपूरक पर्यटनाच्या एकात्मिक विकासासाठी स्वदेशी दर्शन-ईशान्य विभागातल्या मिझोरमच्या तेंझाल आणि साऊथ झोटेच्या सेर्शिप व रीक जिल्ह्यात 92.25 कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला.

त्यापैकी 64.48 कोटी रुपये तेंझाल येथील गोल्फ कोर्ससह विविध घटकांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

तेंझाल येथील गोल्फ कोर्सची रचना कॅनडामधील अव्वल क्रमांकाची गोल्फ कोर्स वास्तुविशारद कंपनी म्हणून ओळख असलेल्या ग्रॅहॅम कूक अँड असोसिएट्स यांनी केली आहे.

चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना

चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता.

गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.

भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे.

आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमाचा विस्तार

आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा लाभ संपूर्ण जगाला मिळावा या उद्देशाने जगव्यापी विस्ताराच्या दृष्टीने ‘ISA कार्यचौकटी’मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

दुरुस्तीच्या प्रस्तावानुसार, उष्णप्रदेशापलीकडील देशांसह संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय गटाचे सर्व 192 सदस्य आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.

पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार आणि फ्रांस सरकार यांच्यावतीने सुरू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे.

भारतात गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संस्था आहे.

कोविड-19 विषाणूसंबंधित देशातल्या पाच समर्पित बायोरेपॉझिटरी

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वात देशतला पहिला ‘1000 SARS-CoV-2 RNA जीनोम सिक्वेंसींग’ कार्यक्रम यशस्वी पार पाडला गेला आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

यांच्या अंतर्गत देशभरात आढळलेल्या रुग्णांची आणि केलेल्या तपासणीतून निष्पन्न झालेली संपर्ण माहिती एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात गोळा करण्यात आली ज्याला ‘बायोरिपॉझटरी’ असे म्हटले जाते.

अश्या भारतात पाच समर्पित कोविड-19 बायोरिपॉझटरी स्थापन करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत

  1. ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI) फरीदाबाद
  2. इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्स (ILS) भुवनेश्वर
  3. इंस्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीअरी सायन्स (ILBS) नवी दिल्ली
  4. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) पुणे
  5. इंस्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन (InStem) बेंगळुरू.
Scroll to Top