तापमानाचा प्रभाव
- दिवसात सर्वाधिक तापमान दुपारी दोन ते तीन मध्ये
- तापमानावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून
- तापमान वाढल्यास वातावरणाची घनता कमी होते, वायुदाब कमी होतो
- तापमान कमी झाल्यास वातावरणाची घनता वाढते व दाब वाढतो
वायु दाबाचे पट्टे
विषुववृत्तीय पट्टा (कमी वायुदाब – डोलड्रम)
- विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्त यांच्या दरम्यान.
- वर्षभर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे तापमान सर्वाधिक व पर्यायाने वायुदाब सर्वात कमी.
- यात आंतरउच्च कटिबंधीय संमीलन विभाग ITCZ असे म्हणतात
- येथे परिवलनाचा वेग जास्त त्यामुळे हवा बाहेर फेकली जाते कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
- येथे दररोज अभिसरण प्रकारचा मुसळधार पाऊस पडतो
मध्य अक्षांशीय उपोषण कटिबंधीय पट्टा (जास्त वायुदाब)
- विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 25 अंश उत्तर व 25 अंश दक्षिण अक्षवृत्त यांच्या दरम्यान.
- येथे कमी दाबाच्या पट्ट्यातून आलेली उष्ण हवा उंचावर येऊन थंड होते त्यामुळे येथे जास्त वायू दाबाचा पट्टा
- यांना शांत पट्टे किंवा अश्व अक्षवृत्ते असे म्हणतात
60 अंश अक्षवृत्ता जवळील उपध्रुवीय (कमी दाबाचा पट्टा)
- विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 60 अंश उत्तर व 60 अंश दक्षिण अक्षवृत्त यांच्या दरम्यान.
- पृष्ठभागाचे घर्षण व पृथ्वीच्या परिवलनामुळे हवा वर ढकलली जाते त्यामुळे कमी वायुदाबाचे पट्टे निर्माण होतात
ध्रुवांकडे जास्त दाबाचे पट्टे
- ध्रुवीय प्रदेशात. 90 अंश अक्षादरम्यान.
- येथे तापमान वर्षभर शून्य अंश सेल्स पेक्षा कमी असते त्यामुळे वर्षभर हवा थंड. त्यामुळे येथे जास्त दाबाचे पट्टे