संविधान सभा (घटना समिती)
- त्रिमंत्री योजनेच्या (कॅबिनेट मिशन) शिफारशीने स्थापना.
- यात ब्रिटिश भारतासाठी 296 व संस्थानिकांसाठी 93 असे एकूण 389 सदस्य.
- जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये ब्रिटिश भारतातील 296 जागांसाठी निवडणुका संपन्न.
- यात राष्ट्रीय काँग्रेसने 208, मुस्लिम लीगने 73 तर अपक्षांनी 15 जागा जिंकल्या.
- संस्थानिकांचा संविधान सभेत सामील होण्यास नकार.
- 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत. यानुसार भारताच्या फाळणीला मंजुरी.
- फाळणीनंतर संविधान समितीची सदस्य संख्या 299. (यात प्रांतांचे 229 तर संस्थानिकांचे 70 सदस्य.)
- प्रांतांच्या सदस्यापैकी 55 सदस्य संयुक्त प्रांतातून तर 21 सदस्य मुंबई प्रांतातून.
- घटना समितीत 30 अनुसूचित जातींचे सदस्य.
- राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर, गणेश मावळणकर, बलवंत राय मेहता, नलिनी घोष, श्यामाप्रसाद मुखर्जी, एम आर जयकर, कन्हैयालाल मुंशी, चक्रवर्ती राजगोपालाचारी हे प्रमुख पुरुष सदस्य
- राजकुमारी कौर, अमोल स्वामीनाथन, बेगम रसूल, दाक्षायणी वेलायुधन, रेणुका रे, लिला रे, कमला चौधरी, पौर्णिमा बॅनर्जी, मालती चौधरी, हंसाबेन मेहता, दुर्गाबाई देशमुख, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, एनी मस्करेन, सुचेता कृपलानी या प्रमुख महिला सदस्य.
- फ्रँक अँथनी हे अँग्लो इंडियन सदस्य तर एचपी मोदी हे पारशी सदस्य.
संविधान सभेची अधिवेशने
- एकूण 11 अधिवेशने.
- पहिले अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946 तर शेवटचे 11 वे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीत.
- पहिले अधिवेशन दिल्ली येथे. सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष. 211 सदस्य उपस्थित. मुस्लिम लीगच्या 73 सदस्यांचा अधिवेशनावर बहिष्कार.
- 11 डिसेंबर 1946 रोजी राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी, हरेंद्रकुमार मुखर्जी यांची उपाध्यक्षपदी तर बी एन राव यांची सल्लागारपदी निवड.
संविधान सभेच्या समित्या
- एकूण 22 समित्या
- खालील यादीत समितीचे नाव व पुढील कंसात त्यांच्या अध्यक्षाचे नाव.
- मसुदा समिती (बाबासाहेब आंबेडकर), संघराज्य घटना समिती (पंडित नेहरू), संघराज्य अधिकार समिती (पंडित नेहरू), राज्य समिती (पंडित नेहरू), प्रांतीय राज्यघटना समिती (सरदार पटेल), नियम समिती (राजेंद्र प्रसाद), अर्थ समिती (राजेंद्र प्रसाद), राष्ट्रध्वज तात्कालीक समिती (राजेंद्र प्रसाद), सुकाणू समिती (राजेंद्र प्रसाद), गृह समिती (पट्टाभी सीतारमय्या), मसुदा चिकित्सा समिती (जवाहरलाल नेहरू), अधिकार पत्र समिती (अल्लादी कृष्णस्वामी अय्यर), राज्यघटना कार्यकारी समिती (ग वा मावळणकर), भाषिक प्रांतवार समिती (कन्हैयालाल मुनशी), भाषा समिती (मोटुरी सत्यनारायण), मूलभूत हक्क व सल्लागार समिती (सरदार पटेल), नागरिकत्व तात्कालीक समिती (एस वरदचारी), प्रेस गॅलरी समिती (उषा नाथ सेन), ऑर्डर ऑफ बिझनेस समिती (कन्हैयालाल मुंशी), चीफ कमिशनर प्रांत समिती (पट्टाभी सीतारमय्या), सर्वोच्च न्यायालय तात्कालीक समिती (एस वरदचारी), अर्थविषयक तरतुदी विशेषज्ञ समिती (नलिनी रंजन सरकार)
- सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखालील मूलभूत हक्क व सल्लागार समितीच्या 4 उपसमित्या होत्या. यातील मूलभूत हक्क उपसमितीचे जे बी कृपलानी, अल्पसंख्यांक विषयक उपसमितीचे एच सी मुखर्जी, भारत व आसाम मधील काही क्षेत्रांसाठी उपसमितीचे गोपीनाथ बारडोलोई, वगळलेल्या अन्य क्षेत्रांच्या उपसमितीचे ए व्ही ठक्कर हे अध्यक्ष होते.
मसुदा समिती
- 29 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्षपदी निवड.
- अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एम मुंशी, एन गोपाल स्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, डी पी खैतान, बी एल मित्र हे सहा सदस्य होते.
- बीएल मित्र यांच्या राजीनाम्यानंतर एन माधवराव तर डीपी खैतान यांच्या निधनानंतर टीटी कृष्णम्माचारी यांची सदस्य पदी निवड.
- एन गोपाल स्वामी अय्यंगार हे कश्मीरच्या राजा हरिसिंगाचे दिवाण होते. त्यांनी कलम 370 चा मसुदा तयार केला.
- मसुदा समितीचे कामकाज 29 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात.
- अवघ्या 141 दिवसात संविधानाचा मसुदा तयार.