इंग्रज मराठा युद्धे – भाग ३
तिसरे इंग्रज मराठा युध्द (१८०४-१८०६)
०१. होळकर १८०४ साली इंग्रजांचे जयपूर घेऊन त्यांच्याशी संघर्ष करीतच होता. त्यामुळे इंग्रजांनी कर्नल मॉन्सन याच्या नेतृत्वाखाली होळकरावर फौज पाठविली. परंतु होळकरांनी त्याचा पराभव केला. या यशाने स्फुरण चढून होळकराने दिल्लीलाच वेढा दिला. परंतु इंग्रजांच्या कर्नल एक्टरलोनी व कर्नल बर्न यांनी होळकरांचा वेढा मोडून काढला.
०२. त्यानंतर इंग्रजांनी होळकरांचा मित्र असलेल्या भरतपुरच्या राजावर चढाई केली. भरतपुरच्या राजाला १० एप्रिल १८०४ रोजी इंग्रजांशी भरतपूर तह करणे भाग पडले. यानुसार भरतपुरच्या राजाने २० लाख रुपये खंडणी देण्याचे कबुल करून इंग्रजांचे शत्रू व मित्र असलेल्यांना आपलेही शत्रू व मित्र मानण्याचे मान्य केले.
०३. यानंतर वेलस्ली जाऊन लॉर्ड कॉर्नवलिस त्याच्या जागी आला होता. इंग्रजांनी ७ जानेवारी १८०६ रोजी होळकरासोबत राजघाटचा तह केला. या तहानुसार होळकराने चंबळ नदीच्या उत्तरेकडील प्रदेश, पुणे व बुंदेलखंड या प्रदेशावरील आपला हक्क सोडून दिला.
०४. इंग्रजांनी होळकरांच्या चंबळेच्या दक्षिणेकडील प्रदेशात हस्तक्षेप करण्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे इंग्रजांनी टोंक, रामपूर व बुंदी टेकड्यांच्या उत्तरेकडील प्रदेश होळकरास परत केला आणि चंबळेच्या उत्तरेकडील प्रदेश व जयपुरातील आपली फौज मागे घेतली.
चौथे इंग्रज मराठा युध्द (१८१७-१८१८)
०१. वसईच्या तहानंतर इंग्रजांच्या संरक्षणाखली पेशवे पद मिळाल्यानंतर बाजीरावास फार बरे वाटू लागले पागोटेवाल्या मराठयांपेक्षा टोपीवाले इंग्रज हेच खरे आपले मित्र आहेत. असे त्याचा समज झाला होता. त्या वेळी पुण्याचा इंग्रज रेसिडेंट कर्नल क्लोज बाजीरावाशी अत्यंत प्रेमाने वागत असे.
०२. पुढे १८११ मध्ये कर्नल क्लोजच्या जागी आलेल्या एल्फिन्स्टनने बाजीरावाच्या जहागीरदारांविरुध्द असलेल्या भूमिकेला विरोध केला. एवढेच नव्हे, तर दक्षिणेतील जहागीरदारांना संरक्षण देण्याचे ठरविले त्यामूळे बाजीराव व एल्फिन्स्टन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.
०५. बाजीरावाने आपल्या वतीने बोलणी करण्यासाठी त्रिंबकजी डेंगळे यांची नेमणूक केली होती. ही बोलणी असफल होण्याची चिन्हे दिसत असतानाच २० जूलै १८१५ रोजी गंगाधरशास्त्री पटवर्धनाचा पंढरपुर येथे भजनदास चौकात खून झाला.
०६. एल्फिन्स्टनने या खुनाबाबत त्रिंबकजीस कैद करुन इंग्रजांच्या ताब्यात दिले. इंग्रजांनी त्रिबंकजीस ठाण्याच्या तुरुंगात टाकले. या घटनेमुळे इंग्रजांचा राग येऊन बाजीरावाने अंतस्थपणे इंग्रजाविरोधी कारवाया करण्यास सुरुवात केली.
१६. शिंदे , होळकर, भोसले यांची मदत मिळेल म्हणून बाजीराव उत्तरेकडे गेला होता. पण त्यापूर्वीच इंग्रजांनी त्या सर्वांचा पराभव केला होता.१८११ मध्ये यशवंतराव होळकर मरण पावला. त्यानंतर त्याची बायको तुळसाबाई ही संस्थानचा कारभार पाहत असे. बाजीरावाचा पाठलाग करीत इंग्रजांचे सैन्य उत्तरेकडे गेले होते.
१७. बाजीरावाच्या साहाय्यासाठी तुळसाबाईने सैन्य धाडले. परंतु तिच्या राज्यातील गोंधळामुळे तिच्याच सैनिकांनी तिला ठार मारले. इंग्रजांनी महिदपूरच्या लढाईत होळकरांचा पराभव केला. त्यानंतर दुसरा मल्हारराव होळकर याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला.
१८. १८१६ मध्ये रघुजी भोसले वारल्यावर त्याचा मुलगा परसोजी गादीवर आला. तो मेल्यावर त्याचा चुलत भाऊ आप्पासाहेब याने वारसाहक्कासाठी इंग्रजांशी तह केला. १८१८ मध्ये इंग्रजांनी त्यास नामधारी राजा केले.
१९. उत्तरेकडे पळून जात असताना नर्मदेच्या परिसरात धुळकोट जवळ इंग्रजानी बाजीरावला घेरले. अखेर ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीराव पेशवा सर जॉन माल्कमला शरण गेला.बाजीरावची कानपूर जवळ बह्मवर्त उर्फ बिटूर येथे वार्षिक ८ लाख रुपये पेन्शनवर रवानगी झाली. २८ जानेवारी १८५१ रोजी त्याचा मृत्यू झाला.
२०. छत्रपती इंग्रजांच्या स्वाधीन झाले. छत्रपती प्रतापसिंह भोसले यांना साताऱ्यालगत काही भाग देऊन एक लहानसे राज्य त्यांना बहाल केले. पश्चिम भारताचा प्रचंड मोठा भूप्रदेश इंग्रजांच्या प्रत्यक्ष सत्तेखाली आला. मराठी साम्राज्य इंग्रजी राज्यात विलीन झाले. चौथ्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांनी विजय मिळवून मराठी सत्ता मुळापासून उखडून काढली.
२१. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर इंग्रजांनी भारतातील मराठ्यांची प्रबळ सत्ता नामशेष केली. १८१५ मध्ये पेशव्यांच्या राज्याचे एकूण उत्पन्न ९७ लक्ष होते, त्यांतील २३ लाखांचा मुलूख सातारच्या छत्रपतींकडे होता. बाजीरावाला आठ लाखांची पेन्शन दिल्यानंतर इंग्रजांना बाकी उत्पन्नाचा प्रदेश मिळाला.
मराठेशाही नंतरचा काळ
०२. उदारमतवादी धोरण ठेऊन त्याने न्याय, शिक्षण व प्रशासन या विषयांत रस घेतला आणि सुरवातीच्या काळात तरी इंग्रजी राजवटीबद्दल लोकमानसात प्रीती उत्पन्न झाली.