राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

पहिले कॉंग्रेस अधिवेशन

०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले असते.

०२. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेसाठी सर एलन ऑक्टोव्हीयन ह्यूम यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र पाठवून पाठींबा मागितला होता.

०३. आपल्या अध्यक्षीय भाषणत व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी कॉग्रेसचे ध्येय धोरण पुढीलप्रमाणे सांगितले.

—–देशाच्या विभिन्न विभागातून आलेल्या व देशसेवा करु इच्छिणाऱ्या कार्यकत्यांनी परस्पर परिचय करुन घेणे व मैत्री निर्माण करणे.
—–सर्व देशप्रेमी लोकांमधील वंशभेद, पंथभेद, प्रांतीय संकुचित भावना दुर करून त्यांच्यात राष्ट्रीय एकतेची निर्मिती करणे.
—–हिंदी जनतेच्या प्रश्नांवर विचार करुन त्याला प्रसिध्दी देणे.

—–पुढील वर्षी घ्यावयाच्या कार्यक्रर्माचा आराखडा तयार करणे.

* या अधिवेशात काही ठराव पास करण्यात आले. त्यातील प्रमुख ठराव पुढीलप्रमाणे होते.

०१. भारताच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमावे आणि त्यात भारत व इंग्लंड या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.

-तसेच भारतीय प्रश्नांबाबत दोन्ही देशातील प्रतिनिधींनी त्याविषयी विचारविनिमय करावा.

-हिंदू चे संपादक सुब्रम्हण्य अय्यर यांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि फिरोजशहा मेहता व नरेंद्रनाथ सेन यांनी आपल्या भाषणात त्याचे समर्थन केले.

०२. भारतमंत्र्याचे इंडिया कौन्सिल रद्द करण्यात यावे असा ठराव चिपळूणकरांनी मांडला. वास्तविक पाहता इंडिया कौन्सिलची निर्मिती भारताच्या हितसंबंधाचे रक्षण करण्याकरिता झाली होती.

-पण प्रत्यक्षात यात ते ब्रिटिश साम्राज्याचे हित मोठया प्रमाणावर पाहत असते. त्यामुळे हे ब्रिटिश धार्जिणे इंडिया कौन्सिल बंद करावे अशी भारतीय नेत्यांनी मागणी केली होती.

०३. मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात मोठया प्रमाणावर लोकनियूक्त सदस्य घ्यावेत, या विचारण्याचा अधिकार असावा.

-कायदेमंडळास आपले म्हणणे ब्रिटिश पार्लमेंटपूढे मांडंण्यासाठी पार्लमेंटचे एक कायमस्वरूपी मंडळ असावे.

-सनदी सर्वंटची परिक्षा इंग्लंडप्रमाणेच भारतातही घेण्यात यावी परीक्षेसाठी वयोमर्यादा १९ वरुन २३ वर न्यावी.

०४. लष्करी खर्च वाढवू नये वाढल्यास संरक्षक जकाती बसवून तो खर्च वसूल करावा. भारत सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारने हमी द्यावी. युध्दाच्या खर्चाचा बोजा जनतेवर लादू नये.

०५. लॉर्ड डफरिनने याच सुमारास उत्तर ब्रहादेशावर स्वारी केली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी धोरणावर टिका करणारा ठराव संमत करण्यात आला.

-ब्रम्हदेशावर ताबा मिळवला तर तो देश भारतात सामील न करता एक स्वतंत्र वसाहत म्हणून ठेवावा असे फिरोजशहा मेहतांनी सुचविले.

०६. एका ठरावात असेही म्हटले होती की या पहिल्या अधिवेशात जे प्रस्ताव मंजूर झाले. असतील ते देशातील भिन्नभिन्न संस्थांतून पाठवून त्यावर कार्यवाही व्हावी.

१८८६ कलकत्ता अधिवेशन

०१. दादाभाई नौरोजी कॉंग्रेसचे दुसरे अध्यक्ष व पहिले पारशी अध्यक्ष बनले.
-या अधिवेशनात राणी व्हिक्टोरियाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून तिच्या नावाचा तीन वेळा जयजयकार करण्यात आला.
-या अधिवेशनानंतर व्हाईसरॉय लॉर्ड डफरीनने कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांना गार्डन पार्टी दिली.

१८८७ मद्रास अधिवेशन

०१. बद्रुद्दिन तय्यबजी कॉंग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष बनले.

१८८८ अलाहाबाद अधिवेशन

०१. जॉर्ज यूल कॉंग्रेसचे पहिले परदेशी अध्यक्ष बनले. जॉर्ज यूल मुळचे युरोपियन व कलकत्त्यातील एक व्यापारी होते.

०२. हे अधिवेशन भरू नये यासाठी ब्रिटिशांनी अनेक अडथळे आणले. लॉर्ड डफरीनने या अधिवेशनावेळी “सरकारी नोकरदारांनी राष्ट्रीय सभेत भाग घेऊन नये” असे परिपत्रक काढले होते.

१८८९ मुंबई अधिवेशन

०१. यात टिळक व गोखले प्रथमच हजर राहिले. या अधिवेशनात पंडिता रमाबाई यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच १० महिला उपस्थित होत्या.

०२. राष्ट्रीय सभेत शेतकऱ्यांचा समावेश असावा. या कारणासाठी या अधिवेशनावेळी महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढून कॉंग्रेसचा प्रतीकात्मक पुतळा जाळला होता. विल्यम वेडर्णबर्न कॉंग्रेसचे दुसरे परदेशी अध्यक्ष बनले.

१८९६ कलकत्ता अधिवेशन

यात बंकिमचंद्र चैटर्जी लिखित ‘वन्दे मातरम’ हे गीत प्रथमच रवींद्रनाथ टागोर यांनी गायिले. हा पहिलाच राजकीय मेळावा होता जेथे हे गीत सामुहिकरित्या गायिले गेले.
-या गीताला संगीतसुद्धा रवींद्रनाथ टागोर यांनीच दिले.

१९०० लाहोर अधिवेशन

०१. न्या. चंदावरकर अधिवेशनाचे पहिले मराठी अध्यक्ष बनले.

०२. भारतातील पहिली पदवीधर महिला कादंबिनी गांगुली यांना कॉंग्रेसच्या मंचावर भाषण करणाऱ्या पहिल्या महिलेचा मान मिळाला.

१९०५ बनारस अधिवेशन

०१. यात वेल्सचा राजकुमार व राजकुमारी हजर राहणार होते. त्यांचा सत्कार करावा असा प्रस्ताव मवाळ गटाने मांडला. जहाल गटाने प्रस्तावाला तीव्र विरोध केला.
-तरीसुद्धा मवाळांनी त्यांचा सत्कार केला. येथूनच जहाल व मवाळ यांच्यात मतभेद वाढत गेले.

१९०६ कलकत्ता अधिवेशन

०१. या अधिवेशनात जहाल गटाकडून लोकमान्य टिळक  होते. त्यामुळे मवाळ गटाने या वेळी दादाभाई नौरोजी यांचे नाव पुढे केले.

-दादाभाई यांच्यामुळे टिळकांनी आपले नाव मागे घेतले. यानंतर टिळक कॉंग्रेसचे एकदाही अध्यक्ष बनू शकले नाहीत.

०२. येथेच दादाभाईनी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार, स्वराज्य या चतुःसूत्रीचा स्वीकार केला. दादाभाईनी “स्वराज्य” हे कॉंग्रेसचे ध्येय म्हणून घोषित केले.

-म्हणूनच दादाभाईंना स्वराज्याचे पहिले उद्गाते म्हणतात. याच अधिवेशनात ‘वन्दे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्यात आले.

०३. या अधिवेशनात बंगालची फाळणी रद्द करण्यात यावी असा ठराव ढाक्याचे नवाब ख्वाजा अतिकउल्लाखान यांनी मांडला.

-याचवर्षी भारतात आगाखान व सलीमउल्ला खान यांनी ३० डिसेंबर १९०६ रोजी ढाका येथे मुस्लीम लीगची स्थापना केली.

Scroll to Top