स्वातंत्र्याचा हक्क – कलम १९
४. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा ;
५. भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा; [ ** आणि ]
. कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय , व्यापार किंवा धंदा चालवण्याचा , हक्क असेल.
यांच्याशी जेथवर संबद्ध असेल तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही.
४४ वी घटनादुरुस्ती १९७८ नुसार संपत्तीचे स्वातंत्र्य हा अधिकार मूलभूत अधिकारातून वगळण्यात आला.
स्वातंत्र्याचा हक्क – कलम २०
०१. नो एक्स फॅक्टो लॉ [No Ex Facto Law]
०२. नो डबल जिओपार्डी [No Double Jeopardy]
०३. नो सेल्फ इनक्रिमीनेशन [No Self Incrimination]
स्वातंत्र्याचा हक्क – कलम २१जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण .
१९४८ साली जागतिक मानवी हक्क जाहीरनामा प्रकाशित झाला. तर १९६६ साली सांस्कृतिक व राजकीय हक्कांचा जाहीरनामा जाहीर झाला.
याविषयी खटले
परंतु संसदेने एखाद्या कायद्याच्या माध्यमातून जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांना संकुचित केले तर तो कायदा अवैध ठरविता येणार नाही
मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार या १९७८ च्या खटल्यात, सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला कि कार्यकारी मंडळाची कृती संसदीय कायदा मूलभूत अधिकाराशी विसंगत असेल तर तो रद्दबातल ठरेल.
या खटल्याच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाने कलम-२१ चा व्यापक अर्थ लावून त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश केला.
कलम २१ मध्ये या अधिकारात पुढील अधिकारांचा समावेश आहे
२. स्वच्छ पर्यावरण व प्रदूषणरहित
३. आरोग्यमय जीवन जगण्याचा अधिकार
४. सरकारी हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळविण्याचा अधिकार
५. एकट्याला कारावासात डांबण्याविरुद्धचा अधिकार
६. हातकडी लावण्याविरुद्धचा अधिकार
७. विदेश यात्रा करण्याचा अधिकार
८. सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याविरुद्धचा अधिकार
९. एकान्तवासाचा अधिकार
१०. तुरुंगातील अमानवीय परिस्थिती विरुद्ध अधिकार
११. लांबलेल्या फाशीविरुद्ध अधिकार
१२. शिक्षणाचा अधिकार
१३. लवकर न्याय मिळविण्याचा अधिकार
१४. झोप मिळविण्याचा अधिकार
१५. पशूंना मोकळे मिळण्याचा अधिकार
१६. माहिती मिळविण्याचा अधिकार
शिक्षणाचा हक्क – कलम २१ क
त्यानंतर ८६ वी घटनादुरुस्ती २००२ नुसार, भारतीय संविधानामध्ये प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट करण्यात आला.
कलम २१ क नुसार, शिक्षणाचा हक्क – राज्य , सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी , राज्यास विधिद्वारा निर्धारित करता येईल अशा रीतीने , मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील. ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्याची असेल.
कलम ४५ मध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा बालकांसाठीच्या प्राथमिक शिक्षणाचा उल्लेख आहे. तसेच मूलभूत कर्तव्ये कलम ५१ (A)(K) मध्येसुद्धा याचा उल्लेख आहे.
स्वातंत्र्याचा हक्क – कलम २२विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण .
अशा अटकेची कारणे जाणून घेता येईल,
शक्य तितक्या लवकर तिला कळवल्याशिवाय, तुरुंगात स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा
आपल्या पसंतीच्या विधिव्यवसायीचा विचार घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही .
०४. प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणार्या कोणत्याही कायद्याद्वारे, दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचा प्राधिकार , समुचित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या शिफारशींनुसार घटित केलेल्या सल्लागार मंडळाने उक्त दोन महिन्यांचा कालावधी संपण्यापूर्वी , आपल्या मते अशा स्थानबद्धतेला पुरेसे कारण आहे असा अभिप्राय दिलेला नसेल तर , दिला जाणार नाही :
०७. —
— क. प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणार्या कोणत्याही कायद्याखाली कोणत्याही एका वा अनेक वर्गातील प्रकरणी कोणत्याही व्यक्तीस जितका काळ स्थानबद्ध करता येईल तो कमाल कालावधी ; आणि
— ख. खंड (४) याखालील चौकशीत सल्लागार मंडळाने अनुसरावयाची कार्यपद्धती , संसदेस कायद्याद्वारे विहित करता येईल .
शोषणापासून संरक्षणाचा हक्क – कलम २३
०१. माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरुपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. मूलभूत हक्क
शोषणापासून संरक्षणाचा हक्क – कलम २४
चौदा वर्षे वयाखालील कोणत्याही बालकास , कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही .
‘संविधानातील मूलभूत हक्क’ भाग – १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
‘संविधानातील मूलभूत हक्क’ भाग – ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.